|
||
|
||
जालना
जिल्हयात ग्राम पंचायतींच्या सहभागाने आणि पब्लिक प्रायव्हेट पीपल्स
पार्टीसिपेशन (पीपीपीपी मॉडेल) च्या माध्यमातून व्हायबल आणि फिजीबल मॉडेल
तयार करण्यात आले आहे. या ग्राम सेवा केंद्रांच्या माध्यमातून 200 पेक्षा
जास्त सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. . शासनाच्या सर्व सेवा
ग्रामपातळीवर उपलब्ध करुन देण्यासाठी भारतात अशा प्रकारचे ग्राम सेवा
केंद्र सुरु करणारा जालना हा पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दहा ठिकणी ही ग्राम सेवा केंद्र सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात महाऑनलाईन या एजन्सीच्या नियुक्तीस जिल्हा सेतू समितीकडून मान्यता घेण्यात आली. हे केंद्र व्यवस्थितपणे चालावेत म्हणून या केंद्राच्या सुविधांच्या वाटपातून मिळणाऱ्या पैशांचे वितरणही योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. यात 10 टक्के + 45 टक्के + 45 टक्के अशा प्रकारे प्राप्त रकमेचे राज्य सेतू समिती + जिल्हा सेतू समिती + सेतू चालक यामध्ये वितरण केले. केवळ जिल्ह्यातील काही गावातच हे ग्राम सेवा केंद्र सुरु न करता जिल्ह्यातील सर्वच 781 गावांमध्ये महाऑनलाईन या एजन्सीच्या माध्यमातून हे सेवा केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या तालुक्यात प्रत्येकी दहा प्रमाणे एकूण 80 ग्राम सेवा केंद्र डिसेंबर 2011 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्थांना 200पेक्षा अधिक सेवा देण्याचा मानस होता. यात विविध प्रमाणपत्रांचा समावेश होता. तथापि, पहिल्या टप्प्यात 43 सेवा सेवा सुरु करण्यात आल्या होत्या त्यामध्ये सातबारा उतारा, 8-अ चा उतारा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, शपथपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर आदी सेवांचा समावेश होता. या सेवा मिळविण्यासाठी ग्रामस्थांना तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रामध्ये खेटे मारावे लागत असत आणि दलालांच्या थापांना बळीही पडावे लागत असे, परंतु या सेवा गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांचा वेळ, पैश्यांचा अपव्यय आणि मनस्तापातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आनंदीही झाले आहेत. इतक्या सहज व सुलभपणे या सगळया सुविधा कुठलाही त्रास सहन न करता मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या बाबत आदराची भावनाही निर्माण झाली आहे. शासनाची प्रतिमा उंचावण्यातही यामुळे मदत होत आहे. एवढेच नव्हे तर शासन इतके पारदर्शक असू शकते, हा ही वेगळा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. आज घडीला जिल्ह्यातील 565 पेक्षा अधिक गावांमध्ये ही ग्राम सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या योजनेत इ-पीआरआय कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना वाढीव मावेजा देण्याची सोय होऊ शकते. संगणकाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या होतकरु तरूणांना आपल्या गावात किंवा तालुक्यात आपल्या जनतेची सेवा करण्याची आणि स्वत:चे उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गावकऱ्यांना इंटरनेटमुळे बाजारभाव, हवामानाचा अंदाज याबाबतची माहितीही गावांतील गावातच मिळू शकेल. या ग्रामसेवा केंद्राशी जिल्हयातील सर्वच गावांतील ग्रामस्थांचा संबध येणार आहे. याबरोबरच सर्वच ग्रामस्थ जगाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळं जालना जिल्ह्याने ग्राम सेवा केंद्राच्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीनं शासनाच्या कामात पारदर्शकता निर्माण करण्याची क्रांतीच केली आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही.याचाच परिणाम म्हणून भारत सरकारने जालना जिल्हयाची सार्व्हिस प्लस संगणकीय प्रणालीच्या वापरासाठी निवडली आहे. दिल्ली येथील एनआयसीने (NIC)केद्र सरकारच्य ग्राम विकास मंत्रालयासाठी देशातील जनतेला त्यांच्या गावातच विविध सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी service plus हे संगणकीय सॉप्टवेअर बनविले आहे. याबाबतची एक कार्यशाळा मध्यप्रदेशातील पचंमढी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस महाराष्ट्रातील जालना, अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्हयातील जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि जिल्हा एनआयसी (NIC) चे अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत जालना जिल्हयात ग्राम सेवा केंद्र सुरु झाली असल्यामुळे या service plune संगणकीय सॉप्टवेअर या प्रयोगिक तत्वावर देशात प्रथम वापर करण्याचा निर्णय झाला. जालना जिल्हयातील ग्राम सेवा केंद्रातून service plus सॉप्टवेअर वापरण्यास सुरु झाल्यास या केंद्रातून लाभार्थ्याने दाखल केलेल्या कागदपत्राची फाईल फिजिकली तालुक्याच्या किंवा जिल्हयाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिका-याच्या मान्यतेसाठी घेऊन येण्याची गरज राहणार नाही. या सॉप्टवेअरमुळे ही फाईल अतिशय कमी वेळात (स्कॅानवरुन ) तालुका आणि जिल्हयाच्या ठिकाणी पाठविण्यात येईल. ती फाईल बघून संबधित अधिकारी योग्य तो निर्णय लागतील संबधित ग्रामसेवा केंद्रास कळवू शकेल. त्यामुळे वेळेचा अपव्यय होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांना जलद गतीने सेवा देता येतील.ग्रामस्थांची अडवणूक होणार नाही. यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी, जालना |
A Blog dedicated for the aspirants of the Limited Departmental Competitive Examination of Inspector (Posts) and other Departmental Exams
Tuesday, July 31, 2012
Monday, July 30, 2012
गगन नारंगला नेमबाजीत कांस्य ..........
लंडन येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०१२ मध्ये आज भारताच्या गगन नारंगने १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये भारताला पहिलेवहिले पदक मिळवून दिले.आज झालेल्या अंतिम फेरीत गगनने एकूण ७०१.१ गुण पटकावून ही भरारी घेतली. बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणा-या अभिनव बिंद्राचे मात्र लंडन ऑलिंपिकमधले दहा मीटर एअर रायफल स्पर्धेतले आव्हान स्पुष्टात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)